आमीरला आवडला मराठमोळा ‘मुरांबा’

सामना ऑनलाईन । मुंबई

मुरांबा आणि आमीर खान..? हे काय समीकरण आहे बुवा…? असा प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे. पण, आमीरला आवडलेला हा मुरांबा ‘खायचा’ नसून ‘पाहायचा’ आहे. आमीर खानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मुरांबाचा ट्रेलर शेअर केला आहे. एक मजेशीर ट्रेलर पाहिला.. अशा कॅप्शनखाली त्याने हा ट्रेलर शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आलोक आणि इंदू या नावांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. या पोस्टवरून त्यांच्या लव्हस्टोरीची भुरळ आमीर खानलाही पडल्याचं दिसत आहे. आलोक आणि इंदूची ही खट्टीमिठी लव्ह स्टोरी असलेला तुमच्या घरातली आमची गोष्ट असं सांगणारा मुरांबा हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.

पाहा आमीरने शेअर केलेला हा मुरांबाचा ट्रेलर