आंगणेवाडी यात्रेतुन मालवण आगारास साडेसात लाखाचे उत्पन्न

133

गतवर्षीच्या तुलनेत एसटीच्या उत्पन्नात वाढ 

सामना ऑनलाईन, मालवण
आंगणेवाडी यात्रोत्सवात जादा बस फेऱ्यांच्या माध्यमातून मालवण आगाराच्या तिजोरीत ७ लाख ४५ हजार १५४ रुपये उत्पन्न जमा झाले. ८२० बस फेऱ्या आंगणेवाडी यात्रोत्सवात पूर्ण झाल्या. याचा ४४ हजार १०५ प्रवाशांनी लाभ घेतला. गतवर्षीच्या तुलनेत १०२ बसफेऱ्या व १ हजार ३८० भाविक प्रवाशांची संख्या कमी होती. मात्र कमी बस फेऱ्यातून अधिक भाविकांनी प्रवास केल्याने १७ हजार १२२ रुपये वाढीव उत्पन्न आगारास प्राप्त झाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक संतोष बोगरे यांनी शनिवारी दिली.

यात्रोत्सवाच्या (२ मार्च) पहाटे २ वाजल्यापासुन शुक्रवार ३ मार्च सायंकाळी ६ वाजेपर्यंत जादा बस सुरु होत्या. मालवण आंगणेवाडी मार्गावर मालवण आडारी, महान मार्गे आंगणेवाडी तर मालवण कांदळगाव मार्गे आंगणेवाडी तसेच अन्य मार्गावरून एसटी गाड्या सोडण्यात आल्या होत्या. गतवर्षी ९२२ बसफेऱ्यातुन ४५ हजार ३८५ प्रवाशांच्या माध्यमातुन आगाराला ७ लाख २८ हजार ३२ उत्पन्न जमा झाले होते. यावर्षी या प्रत्येक बस फेरीत भारमान वाढल्याचे चित्र होते. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले. आगार व्यवस्थापक संतोष बोगरे व बी. डी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चालक, वाहक व मेकॅनीक, अन्य कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेऊन प्रवाशांना चांगली सेवा दिली.

सजलेल्या बस मधून भाविकांचा प्रवास

malvan-st-depot-1मालवण आगारातून आंगणेवाडी यात्रेसाठी एसटी वाहतुकीचे खास नियोजन करण्यात आले होते. यात संतोष पाटील, एस व्ही साळकर, जी. सी. ढोलम, व्ही. पी. केळुसकर, अश्विन भोगले व अन्य काही चालकानी त्यांच्या ताफ्यातील एसटी. एसटी प्रशासनाच्या सहकार्याने स्वखर्चाने सजवल्या होत्या. बसच्या दर्शनी भागात तोरण, फुलांचे हार व विदूत रोषणाई करण्यात आली होती. चालक संतोष पाटील यांनी तर दरवर्षीप्रमाणे बस सजवताना बसवर गेल्या अनेक वर्षाचा बसचा इतिहास चित्र रुपातुन मांडला होता.

आपली प्रतिक्रिया द्या