अशा अधिकाऱ्यांना ठोकून काढायला हवे; ‘आप’च्या आमदाराचे वक्तव्य

36

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना झालेल्या मारहाणीच्या आरोपाने सध्या राजधानी दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात प्रशासन आणि दिल्ली सरकार यांच्यात जुंपलेली असतानाच आणखी एका ‘आप’च्या आमदाराने वादग्रस्त वक्तव्य करत केजरीवाल यांची डोकेदुखी वाढवून ठेवलीय.

उत्तम नगरमधील सभेत बोलताना आपचे आमदार नरेश बलियान यांची जीभ अधिकाऱ्यांवर घसरली. ‘मुख्य सचिवांनी जे खोटे आरोप लावले आहेत, त्याबद्दल त्यांना ठोकले  पाहिजे. मी तर म्हणतो सामान्य माणसांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना हीच वागणूक दिली पाहिजे’असे वक्तव्य बलियान यांनी केले.

बलियान यांची अधिकाऱ्यांवर टीका सुरु असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उपस्थित होते. त्यांनी या वक्तव्याला कोणताही विरोध केला नाही.

एकिकडे अंशू प्रकाश यांनी केलेला मारहाणीचा आरोप आम आदमी पक्ष फेटाळून लावतोय. या प्रकरणात पोलिसांची चौकशी सुरु असतानाच बलियान यांनी केजरीवाल यांच्या उपस्थितीमध्येच हे वक्तव्य केल्याने दिल्ली सरकार आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या