मोठी बातमी: ‘आप’च्या राघव चड्ढा यांचं राज्यसभेतून निलंबन, खोट्यासह्यांचे आरोप

aap-mp-raghav-chadha

खोटारडेपणाच्या आरोपावरून आम आदमी पक्षाचे (आप) राघव चड्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

आपचे खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकाशी संबंधित प्रस्तावात पाच खासदारांच्या सह्या खोट्या केल्याच्या आरोपावरून विशेषाधिकार समितीने निष्कर्ष सादर करेपर्यंत त्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.