आराध्या ऑनलाइन गिरवतेय हिंदीचे धडे!

358

बॉलीवूडचे ‘पॉवरफुल’ बच्चन कुटुंब नुकतेच कोरोना आजारातून बरे होऊन घरी परतले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांची नात आराध्या, तसेच अभिषेक-ऐश्वर्या यांनी कोरोनावर मात केली आहे. अशातच चिमुरडी आराध्या चर्चेत आलेय ती तिच्या एका गोड व्हिडीओमुळे! तिचा हिंदी भाषेचे ऑनलाइन शिक्षण घेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानिमित्ताने आराध्या आणि तिच्या आजोबांच्या भाषाप्रेमाची चर्चा रंगली आहे.

कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सर्कच मुले सध्या ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. अशातच आराध्याचा हिंदी भाषा शिकतानाचा व्हिडीओ समोर आलाय. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाक केला आहे. व्हिडीओमध्ये आराध्या हिंदी कविता बोलताना दिसत आहे. तसेच कविता बोलून झाल्यावर ती ‘धन्यवाद मिस’ असं म्हणून शिक्षकांचे आभार मानताना दिसते. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या फॅन पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या