आरेतील आदिवासींचे आरेतच पुनर्वसन करणे शक्य!

281

आरेतील आदिवासी तसेच बिगर आदिवासी यांचे जिवनमान उंचविण्यासाठी त्यांचे आरेतील एकही झाड न तोडता एकाच ठिकाणी 40 एकर जागेवर पुनर्वसन करणे शक्य आहे. पुनर्वसनाच्या ठिकाणी त्यांना चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा दिल्यास आरेतील 150 एकर जागा अतिक्रमणमुक्त होऊ शकते तसेच तेथे पुन्हा हिरवळ तयार करणे शक्य आहे, असे मत माजी राज्यमंत्री, शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना मांडले. आदिवासाच्या पुनर्वसनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

‘आरेमध्ये विविध ठिकाणी मिळून 27 आदिवासी पाडे असून येथे सुमारे 10 हजारांच्या घरात लोकवस्ती आहे. आरेतील सुमारे 185 एकरवर झोपडपट्टी वसली आहे. येथील आदिवासींचे उपजीविकेचे साधन आरेतच असल्यामुळे त्यांचे तसेच बिगर आदिवासींचे आरेतच एकाच ठिकाणी 40 एकच जागेवर पुनर्वसन केल्यास 150 एकर अतिक्रमित जागा मोकळी करून तेथे पुनश्च हिरवळ निर्माण करण्याठी तत्कालीन महसूलमंत्र्यांची भेट घेतली. परंतु येथील आदिवासी पाडे तसेच बिगर आदिवासींना मूलभूत सोयीसुविधा मिळू नये अशीच भूमिका तत्कालीन महसूलमंत्र्यांनीच घेतली, अशी माहिती वायकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या