बारीक होण्याच्या नादात अभिनेत्रीने जीव गमावला, चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी झाला मृत्यू

चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे अकाली निधन हे अनेकांसाठी जीवाला चटका लावणारे असते. एका तरुण अभिनेत्रीचे अकाली जाणे हे अनेकांसाठी धक्कादायक होते. या अभिनेत्रीचा नवा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या अवघ्या 2 दिवसांत तिने आपले प्राण गमावल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आरती अगरवाल ही वेगाने प्रसिद्ध होत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक होती. तिचा चिरंजिवीसोबतचा इंद्रा द टायगर हा चित्रपट बराच गाजला होता. 2015 साली या अभिनेत्रीचे निधन झाल्याचे कळताच अनेकांना या बातमीवर विश्वासच बसत नव्हता.

आरती अगरवाल हिचा लिपोसक्शन नावाच्या शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला होता. या शस्त्रक्रियेसाठी ती अमेरिकेतील न्यू जर्सी इथल्या खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. शस्त्रक्रियेनंतर काही तासात तिची प्रकृती ढासळली होती. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अवघ्या 31 व्या वर्षी या अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. आरतीने अमेरिकेत ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी हैदराबाद इथल्या डॉक्टरांकडे या शस्त्रक्रियेबाबत विचारलं होतं. ही शस्त्रक्रिया तुझ्या जीवावर बेतू शकते असं सांगत या डॉक्टरांनी तिला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. ही शस्त्रक्रिया करू नकोस तुझ्या त्वचेखाली चरबी नाहीये असं या डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं.

आरती अग्रवाल ही स्थूलतेकडे झुकणारी होती, चित्रपटसृष्टीत टीकायचे असेल तर आपल्याला बारीक व्हावे लागेल असं तिने मनाशी ठरवलं होतं. मात्र यासाठी तिने व्यायामाचा कठीण मार्ग निवडण्याऐवजी शस्त्रक्रियेचा मार्ग निवडला असा तिच्यावर आरोप होतो. जाड असल्याने आरतीला चित्रपट मिळणं कमी झालं होतं, यामुळे ती तणावाखाली होती. 2008 साली तिला फक्त 4 चित्रपट मिळाले होते. यामुळे आरतीने शरीरातील अतिरिक्त चरबी हटवण्याचा निर्णय घेतला होता.

आपली प्रतिक्रिया द्या