हिंदूंची वहिवाट… हीच मलंगमुक्तीची पहाट

सामना ऑनलाईन, कल्याण

‘जय मलंग… श्री मलंग’, ‘हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट’ या जयघोषाने आज मलंगगड दुमदुमून गेला. निमित्त होते माघी पौर्णिमेचे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने 1982 पासून मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू झाले. ही परंपरा अखंड सुरू आहे. आजही सायंकाळी 6 वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मलंगनाथांच्या समाधीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली.

मलंगगडावरील मच्छिंद्रनाथांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी माघ पौर्णिमेला मलंगबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येथे येत असतात. मात्र काही वर्षांपासून मलंगगडावर मुस्लिम समाजाने हे स्थान हाजी मलंग असल्याचा दावा केला आहे. याविरुद्ध शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू झाले होते.

यावेळी आमदार सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणीकर, रूपेश म्हात्रे, स्थायी सभापती रमेश म्हात्रे, गटनेता रमेश जाधव, सभागृह नेता राजेश मोरे, जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, महानगरप्रमुख विजय साळवी, केदार दिघे, कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, महानगरप्रमुख विजय साळवी, डोंबिवली शहरप्रमुख भाऊ चौधरी, अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर, उपजिल्हाप्रमुख बोराडे, दीपेश म्हात्रे, महिला संघटक विजया पोटे, बदलापूर नगराध्यक्ष वामन म्हात्रे, दिनेश देशमुख, रामचंद्र बेलवडे, भाईनाथ महाराज, सचिन बासरे, अशोक म्हात्रे  उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या