प्रसिद्ध अभिनेत्रीचा इंस्टाग्रामवर बोल्ड योगा, पाहा फोटो

2973

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आश्का गरोडीया हिने इंस्टाग्रामवर योगा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. आश्काचे हे फोटोज फारच बोल्ड आहेत. आश्का ही फिटनेस फ्रिक असून ती बऱ्याचदा सोशल मीडियावर तिचे योगा, व्यायाम करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते.

आश्का गरोडीया हिने ब्रेंट गोबल या परदेशी नागरिकाशी लग्न केले असून ते दोघें गोव्यात राहतात. ब्रेंट याचे गोव्यात योगा सेंटर आहे. हे दोघे बऱ्याचदा एकत्र योगा करताना दिसतात. अॅक्रो योगा मध्ये त्या दोघांनीही प्राविण्य मिळवलं आहे. या अॅक्रो योगातीलच एक कठिण आसन करतानाचा फोटो आश्काने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आश्का गरोडीया हिने काही दिवसांपूर्वी टॉपलेस योगा करतानाचे फोटो देखील शेअर केले होते. तिचे ते फोटो न्यूड योगा पासून प्रेरित होते. तिच्याआधी अभिनेत्री अबिगल पांडे हिने देखील टॉपलेस योगा करतानाचे फोटो शेअर केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या