आष्टीत रुग्णवाहिका पेटवून देण्याचा प्रयन्त

रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध नसल्याने जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास १०८ आरोग्य सेवेच्या रुग्णवाहिका चालकाने नकार दिल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आष्टी येथे मंगळवारी घडली

तालुक्यातील घरडगव्हाण येथील एक गर्भवती महिलेस कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. परंतु महिलेची प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना सल्ला दिला. त्यामुळे रुग्णालयाच्या बाहेर उभी असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची नातेवाईकांनी मागणी केली. मात्र चालकाने रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध नसल्याने तुम्ही 108 नंबरला फोन लावून त्यांना कल्पना द्या असे सांगत येण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक करत जाळण्याचा प्रयत्न केला.

घटनेबाबत माहिती समजताच आष्टीचे पोलीस निरीक्षक माधव सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न करणारावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

आपली प्रतिक्रिया द्या