सिद्धार्थ पुन्हा घालणार धिंगाणा

 

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘आता होऊ दे धिंगाणा’चे दुसरे पर्व 21 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
होस्ट सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज आहे. मागच्या पर्वात सुपरहिट ठरलेल्या ‘साडेमाडे शिंतोडे’, ‘बोबडी वळाली’, ‘धुऊन टाक’, ‘रेखाटा पटा पटा’ या फेऱया या पर्वातही असणार आहेत. दोन मालिकांच्या टीममधली सांगीतिक लढत प्रेक्षकांसाठी पर्वणी असेलच, पण त्यासोबतच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती जमतीही या मंचावर उलगडतील. हा कार्यक्रम जेव्हा संपला तेव्हा पुन्हा कधी सुरू होणार याची प्रेक्षकांकडून सातत्याने विचारणा होत होती. नवी ऊर्जा घेऊन हा कार्यक्रम लवकरच भेटीला येतोय. या कार्यक्रमात म्युझिक आहे, मस्ती आहे आणि एक वेगळा धिंगाणा आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पहावा असा हा कार्यक्रम माझ्या अत्यंत जवळचा आहे, अशा भावना सिद्धार्थने व्यक्त केल्या.