दादा कोंडकेच्या ‘ढगाला लागली कळं’ गाण्यावर थिरकणार आयुष्मान खुराणा

1186

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचे गाजलेले गाणे “ढगाला लागली कळ” या गाण्याचे रिमिक्स येणार आहे. अभिनेता आयुष्मान खुराणा याच्या आगामी ड्रिमगर्ल या चित्रपटात या गाण्याचे रिमिक्स घेण्यात आले असून त्यात आयुष्मान नुसरतसोबत थिरकणार आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत आयुष्मान पहिल्यांदाच मराठी गाण्यावर नाचणार आहे. सध्या या गाण्याचे शूटींग सुरू असून आयुष्मानचे चाहते या रिमिक्सची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आयुष्मान खुराना याचा आगामी ड्रिमगर्ल या चित्रपटात तो स्त्रीवेषात दिसून येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटातील आयुष्मान खुरानाचा हटके लूक पाहून त्याचे चाहते जबरदस्त खूष झाले आहेत. या चित्रपटात आयुष्मानसोबत नुसरत भरुचा ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले असून एकता कपूर, शोभा कपूर व आशिष सिंह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट 19 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या