विराटआधी त्याच्या जिगरी मित्राने दिली ‘गोड बातमी’, छोट्याशा परीचे झाले आगमन

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली जानेवारीमध्ये बाबा होण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी त्याच्या आयपीएल संघातील टीम पार्टनर आणि जिगरी यार एबी डिव्हीलिअर्स (AB de Villiers) याच्या घरी पाळणा हलला आहे. एबी तिसऱ्यांदा बाबा झाला असून त्याच्या घरी एका छोट्याशा परीचे आगमन झाले आहे.

एबी डिव्हीलिअर्स आणि त्याची पत्नी डॅनियल डिव्हीलिअर्स (Danielle de Villiers) यांनी चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे. दोघांनी आपल्या तान्हुल्या मुलीसोबत फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

एबी डिव्हीलिअर्स याच्या मुलीचा जन्म 11 नोव्हेंबर, 2020 ला झाला. मुलीच्या जन्माच्या आधी डिव्हीलिअर्स दाम्पत्याला दोन मुले असून हे त्यांचे।तिसरे अपत्य आहे. अब्राहम डिव्हीलिअर्स ज्युनियर आणि जॉन रिचर्ड डिव्हीलिअर्स अशी त्याच्या मुलांची नावे आहेत. अब्राहमचा जन्म 2015 तर जॉन रिचर्डचा जन्म 2017 ला झाला आहे. आता तो तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. एबी डिव्हीलिअर्स याने सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून ही गोड बातमी दिली.

एबी डिव्हीलिअर्स आणि त्याची पत्नी डॅनियल डिव्हीलिअर्स यांनी मुलीसोबत फोटो शेअर केला. आमच्या जगात छोट्याशा आणि सुंदर मुलीचे स्वागत आहे, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. मुलीचे नाव येंते डिव्हीलिअर्स असे ठेवण्यात आले आहे.

img_20201120_175224

दरम्यान, एबी डिव्हीलिअर्स याने 2018 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला होता. दक्षिण आफ्रिकेकडून त्याने 288 एक दिवसीय लढतीत 9,577 धावा केल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सदस्य असून विराट कोहली या संघाचा कर्णधार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या