…म्हणून कलाम मुस्लीम नाहीत, मुस्लीम नेत्याचे वक्तव्य

22

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम मुस्लीम नाहीत, असे तमिळनाडूमधील एका मुस्लीम संघटनेच्या नेत्याने म्हटले आहे. तमिळनाडू तौहिद जमातचा नेता जैनुलबुद्दीन याने नाव अब्दुल कलाम असल्यामुळे ते मुस्लीम होत नाहीत, असे म्हटले आहे. अब्दुल कलाम यांनी जिवंत असताना मूर्तीपूजा केली आहे, तसेच गुरूंचीही पूजा केली आहे, त्यामुळे ते मुस्लीम राहिले नाहीत, असा अजब तर्क जैनुलबुद्दीनने मांडला आहे. मुस्लीम धर्मात मूर्तीपूजा आणि गुरूपूजन केले जात नाही.

कलाम यांच्या हातात ‘वीणा’ आणि शेजारी ‘भगवद्गीता’, मूर्तिमुळे उठले वादळ

कलाम मेमोरिअलमध्ये ठेवण्यात आलेल्या माजी राष्ट्रपतींच्या मूर्तीवरून वाद सुरू आहे. यावर बोलताना जैनुलबुद्दीन यांनी कलाम मुस्लीम राहिले नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कलाम मेमोरिअलमध्ये माजी राष्ट्रपतींची मूर्ती बसवण्यात आली आहे. या मूर्तीच्या हातात वीणा आहे, तर शेजारी हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ भगवद्गीता ठेवण्यात आली आहे. या मूर्तीवरून अनेकांनी भाजपावर टीकास्त्र सोडले होते. अनेकांनी टीका केल्यानंतर कलाम यांच्या मूर्तीसमोर भगवद्गीतासोबत कुराण ठेवण्यात आले आहे. मात्र यालाही काहींनी विरोध केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या