लग्नानंतरही ‘या’ क्रिकेटपटूचे होते सहा महिलांसोबत अनैतिक संबंध

45

abdul-razzak-new

सामना ऑनलाईन । मुंबई

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाक याचे लग्न झाल्यानंतर पाच ते सहा महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. एका कार्यक्रमात मुलाखत देताना रझ्झाकने स्वत: याबाबत सांगितले असून त्याच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुलाखतीमध्ये निवदिकेने रझ्झाकला प्रेमसंबंधांविषयी प्रश्न विचारल्यावर त्याने लग्नानंतरही त्याचे पाच ते सहा अफेयर असल्याचे सांगितले आहे. तसेच या प्रत्येक अफेअरचा कालावधी एक ते दीड वर्षाचाच होता असे देखील त्याने यावेळी सांगितले. त्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

 

अब्दुल्ल रझ्झाक हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज म्हणून संघात आला होता. मात्र नंतर त्याने त्याच्या फलंदाजीत सुधारणा केली होती त्यामुळे तो अष्टपैलू फलंदाज म्हणून देखील प्रसिद्ध झाला.

आपली प्रतिक्रिया द्या