त्याची गोलंदाजी सहज ठोकून काढली असती,बुमराह बच्चाच! अब्दुल रझ्झाकची मुक्ताफळे

1069

प्रतिस्पर्धी फलंदाजांचा थरकाप उडवणारा… टीम इंडियाला एकहाती सामने जिंकून देणारा… अन् जगात नंबर वन वेगवान गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराह Jasprit Bumrah या हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजावर चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत असतानाच शेजारी देश पाकिस्तानातील खेळाडू मात्र ते मान्य करायला तयार नाही. यावेळी पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रझ्झाक Abdul Razzaq याने बुधवारी मुक्ताफळे उधळताना म्हटले की, जसप्रीत बुमराह बेबी बॉलर अर्थातच बच्चा आहे. त्याची गोलंदाजी मी सहज ठोकून काढली असती.

माझ्या कारकीर्दीत मी महान गोलंदाजांचा सामना केलाय. वासीम अक्रम, ग्लेन मॅग्रा यांसारख्या गोलंदाजांसमोर मी फलंदाजी केलीय. त्यामुळे मी आता क्रिकेट खेळत असतो तर माझ्यावर दडपण नसते. जसप्रीत बुमराहवरील दबाव वाढला असता, असे अब्दुल रझ्झाक पुढे म्हणाला. जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला खूप चांगली कामगिरी करताना दिसतो आहे. त्याने स्वतःमध्ये प्रचंड सुधारणा केली आहे. त्याची गोलंदाजीची शैली काहीशी विचित्र आणि वेगळी आहे. त्यातच चेंडूच्या सीमचा (शिवणीचा) योग्य वापर कसा करावा हे त्याला ठाऊक आहे. त्यामुळेच तो खूप परिणामकारक गोलंदाज ठरतो, असेही तो पुढे म्हणाला. जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमधून सावरत आहे. दुखापतीमुळे तो क्रिकेटपासून दूर आहे. ट्रेनर रजनीकांत सिवागननम यांच्या मार्गदर्शनाखाली तो फिटनेसचे धडे गिरवत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या