‘अभिमान’च्या रिमेकमध्ये अभिषेक एेश्वर्या

29

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन हे दोघे चित्रपटात पुन्हा एकत्र कधी दिसणार याची सिनेरसिकांना उत्सुकता आहे. याचं उत्तर मिळालं असून हे दोघे अभिमान या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १९७३ साली प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची प्रमुख भूमिका होती. गायनामध्ये पत्नी ही पतीपेक्षा वरचढ होत गेल्याने पतीच्या मनात निर्माण झालेली चीड आणि त्यातून निर्माण होणारी परिस्थिती हा विषय या चित्रपटात घेण्यात आला होता.

 बॉलीवूडमध्ये अभिषेक बच्चनपेक्षा ऐश्वर्या राय-बच्चन ही अधिक सरस ठरली असल्याचं सांगण्यात येतं. एका चित्रपटाच्या प्रमिअरमध्ये हे दोघे जेव्हा फोटोग्राफरना सामोरे गेले तेव्हा फोटोग्राफर्सनी एकट्या ऐश्वर्याचे फोटो काढायचेत म्हणून सांगायला सुरूवात केली. यामुळे संतापलेल्या अभिषेक बच्चनने तिचा हात झटकून काढता पाय घेतला होता.

प्रसारमाध्यमांसमोर झालेल्या या प्रकारामुळे अभिमानची कथा त्यांच्या वास्तविक आय़ुष्यात घडतेय की काय अशी चर्चा तेव्हा रंगली होती. रिअल लाईफमध्ये घडलेल्या हा प्रसंग लोकांच्या मनात आजही घर करून आहे. अशातच हा चित्रपट येत असल्याने त्याबद्दल उत्सुकता वाढणं स्वाभाविक आहे.
अभिषेक बच्चनला एका चाहत्याने फेसबुक लाइव्हवर एका चाहत्याने या चित्रपटाबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला की ‘अभिमान खूपच विलक्षण चित्रपट आहे. माझ्या आई-बाबांच्या सर्व चित्रपटांपैकी हा माझा आवडता आहे, या चित्रपटाचा रिमेक होणं कठीण आहे
आपली प्रतिक्रिया द्या