पुण्याचा अभिजित कटके भारत केसरी

32

सामना प्रतिनिधी, पुणे

पुण्याच्या मराठमोळ्या अभिजित कटके याने मानाच्या ‘भारत केसरी’ किताबावर आपले नाव कोरले. गतवर्षी उपमहाराष्ट्र केसरी ठरलेल्या अभिजितने कर्नाटकातील जमखंडीत झालेल्या स्पर्धेत हा पराक्रम केला.

६ फुट एक इंच उंचीच्या २२ वर्षीय अभिजितने दिल्लीच्या भीमसिंगचा ७-३ गुण फरकाने पराभव करून आपल्या अभियानास प्रारंभ केला. त्यानंतर त्याने चुरशीच्या लढतीत हरयाणाच्या अनिल कुमारचा ७-५ गुणांनी पराभव केला. तिसऱ्या फेरीत अभिजितने एकतर्फी लढतीत हकाई दलाच्या सतीश फडतरेचा १०-० गुण फरकाने धुव्वा उडविला. मग उत्तर प्रदेशच्या अमित कुमारचे आव्हान अभिजित कटकेने ८-४ फरकाने मोडून काढले. त्यानंतर किताबी लढतीत अभिजितने ‘कर्नाटक केसरी’ शिकय्याला १०-२ फरकाने हरवून ‘भारत केसरी’ किताब पटकाविला. मानाची चांदीची गदा आणि ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन त्याला गौरविण्यात आले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अनुभवी विजय चौधरीला तगडी लढत देणारा अभिजित हा शिवरामदादा तालमीत भरत मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

आपली प्रतिक्रिया द्या