तरणखोप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेचे अभिजित पाटील

36

सामना प्रतिनिधी । पेण

पेण तालुक्यांतील तरणखोप ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे अभिजित पाटील यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. तर उपसरपंचपदी आदित्य पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

तरणखोप ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. सदर थेट सरपंच पदाच्या झालेल्या निवडणूकीत शिवसेनेचे अभिजित पाटील हे निवडून आले. गेली ३५ वर्षे शेकापची या ग्रामपंचायतीवर सत्ता होती. परंतु या निवडणूकीत येथील जनतेने शेकापला नाकारले व शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे.

ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वास सार्थ ठरवणार तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येथील रस्ते, पाणी व सार्वजनिक स्वच्छता हे ग्रामस्थांचे प्रश्न प्राथमिकतेने सोडून पंचक्रोशीचा विकास करण्याचा मनोदय अभिजित पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेनेचे जगदीश ठाकूर, वासुदेव म्हात्रे, अॅड. विकास म्हात्रे, बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस वासुदेव पाटील, काँग्रेसचे अविनाश पाटील, गणेश पाटील, पंडीत पाटील, बाळा पाटील, अशोक आत्माराम पाटील, विलास पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी निवडणूक सहाय्यक निरीक्षक म्हणून मंडळ अधिकारी आर.जे.सुर्यवंशी यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक विलास बारकुंड, तलाठी विलास म्हात्रे, पोलीस पाटील चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या