अभिलाषा म्हात्रेकडे हिंदुस्थानच्या संघाचे नेतृत्व

38

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईची मराठमोळी कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे हिच्याकडे हिंदुस्थानी महिला कबड्डी संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. इराणमध्ये २३ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या आशिया कप कबड्डी स्पर्धेसाठी हिंदुस्थानच्या पुरुष तसेच महिला संघाची निवड शनिवारी करण्यात आली. यावेळी हिंदुस्थानी महिला संघात अभिलाषा म्हात्रेसह सायली जाधव या मुंबईच्या मुलीला स्थान देण्यात आले असले तरी मात्र पुरुषांच्या संघात एकाही महाराष्ट्राच्या खेळाडूला संधी देण्यात आलेली नाही.

पुरुषांचा संघ – अजय ठाकूर (कर्णधार), दीपक हुडा, महेंद्रसिंग ढाका, मनिंदर सिंग, मोहित चिल्लर, नितीन तोमर, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, रोहितकुमार, सचिन, संदीप नरवाल, सुरेंदर नाडा, सुरजीत, विशाल भारद्वाज. महिलांचा संघ – अभिलाषा म्हात्रे (कर्णधार), कंचन ज्योती दीक्षित, कविता, मनप्रीत कौर, मारिया मोनिका, पायल चौधरी, प्रियंका, प्रियंका नेगी, रणदीप कौर, रितू, साक्षी कुमारी, सायली जाधव, शमा परवीन, सोनिया.

आपली प्रतिक्रिया द्या