यूझरने विचारले ‘हॅश आहे का?’, हजरजबाबी अभिषेकचे सडेतोड उत्तर

अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. यूझर्सच्या कमेंट्सवर देखील अभिषेकची नजर असते. त्यामुळेच अभिषेक अनेकदा सडतोड उत्तर देताना आढळतो. अभिषेकने नुकतेच एका ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे.

सध्या ड्रग्ज प्रकरण चर्चेत आहे. अशातच अभिषेकला एका यूझरने विचारले- ‘हॅश है क्या?’

अभिनेत्री दीपिका पदुकोणचे एक चॅट समोर आले आहे. ज्यामध्ये विचारण्यात आले होते की ‘माल है क्या?’ यावरून गंमत करत एका ट्रोलरने अभिषेक बच्चनला विचारले- ‘हैश है क्या?’ अभिषेक बच्चनने त्या ट्रोलरला सणसणीत उत्तर दिले.

अभिषेक ने उत्तर दिले – नाही. सॉरी. असे करू नका. परंतु मला तुमची मदत करण्यास मदत होईल आणि तुम्हाला मुंबई पोलीसच्या समोर उभे करण्यास आनंद होईल. तुमच्या गरजा ऐकून मुंबई पोलिसांना अधिक आनंद होईल आणि ते तुमची मदत करतील. अभिषेकचा हा हजरजबाबीपणा चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

अभिषेकच्या उत्तरावर ट्रोलरने नवा आणि मुद्दा उपस्थित केला. तुमचा पीआर मला त्रास देत आहे. त्यावर अभिषेकने उत्तर दिले, मॅडम माझा कुणी पीआर नाही. काही चाहते म्हणाले की अभिषेक अशा लोकांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही. हे पहिल्यांदाच घडले असे नाही. अभिषेकला त्याच्या अभिनयावरून देखील ट्रोल केले जाते. त्यावेळी देखील तो उत्तर देतो.

आपली प्रतिक्रिया द्या