Happy anniversary : अभिषेकने शेअर केला ऐश्वर्याचा गुलाबी फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडमधील अभिनेता अभिषेक बच्चन सध्या पत्नी ऐश्वर्या आणि मुलगा आराध्यासोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे, याच निमित्ताने ते मालदीवमध्ये सेलिब्रेशन करत आहे. या दरम्यान दोघेही आनंदाचे क्षण आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहेत.

अभिषेकने ऐश्वर्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअऱ केला आहे. या फोटोसोबत अभिषेकने Honey and the moon असे कॅप्शन दिले आहे. ऐश्वर्याचा हा फोटो खूपच सुंदर आणि मनमोहक आला आहे. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये समुद्र किनारी बसलेली ऐश्वर्याची कांती गुलाबी लाईटमध्ये अधिकच चमकत आहे.


View this post on Instagram

Honey and the moon. . . . @niyamamaldives #niyamamaldives #edge

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan) on

याआधी देखील दोघांनी काही फोटो शेअर केले होते. ऐश्वर्याने पुलाजवळ उभा असणारा एक फोटो शेअऱ करत मालदीवमध्ये असल्याचे सांगितले होते.