अभिषेक शर्माची तोडफोड फलंदाजी, गोलंदाजांना अक्षरश: रडकुंडीला आणले, सूर्यकुमारचा विक्रम मोडला

टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि पंजाब संघाचा कर्णधार अभिषेक शर्माने सय्यद मुश्ताक अली करंडकामध्ये तोडफोड फलंदाजी करत गोलंदाजांना अक्षरश: रडकुंडीला आणले. चेंडू टाकावा कुठे या विंवचनेत गोलंदाजांना टाकत अभिषेकने 11 खणखणीत षटकार ठोकले. 28 चेंडूंमध्ये शतक ठोकत अभिषेकने सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला आहे. तसेच उर्विल पटेलच्या सर्वाधिक वेगवान शतकाच्या विक्रमाची बराबरी केली आहे.

मेघालयने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्याने 29 चेंडूंमध्ये 11 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 106 धावा केल्या आणि संघाला एकहाती विजय मिळवून दिला. अभिषेक शर्माच्या वादळी खेळीमुळे मेघालयलने दिलेले 144 धावांचे आव्हान पंजाबच्या संघाने 10 व्या षटकातच पूर्ण केले आणि 7 विकेटने विजय संपादित केला. मेघालयाकडून कर्णधार आकाश चौधरी, हेमंत फुकन आणि आर्यन बोरा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

दरम्यान, नाणेफेक जिंकून मेघालयने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मेघालयची सुरुवात खराब झाली. टप्याटप्याने फलंदाज बाद झाल्यामुले मेघालयाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही. मेघालयकडून अर्पित भाटेवारा याने सर्वाधिक 31 धावा केल्या मात्र इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे मेघालयचा संपूर्ण संघ 142 या धावसंख्येवर तंबुत परतला. पंजाबकडून अभिषेक शर्मा आणि रमनदीप सिंग यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तसेच अश्विन कुमार, हरप्रीत ब्रार आणि धलीवार याांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.