370 कलम हटवल्यामुळे कश्मिरी जनतेला फायदाच!

293

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्याचा जम्मू-कश्मीर आणि लडाखमधील जनतेला फायदाच होईल. जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार झटत असून जनतेनेही देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. राष्ट्रपतींनी आज बुधवारी जनतेला हिंदुस्थानच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या तेव्हा त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, राष्ट्रपतींनी गुरू नानक यांच्या 550 व्या जयंतीदिनी शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या.

नव्या संकल्पना, योजनांमुळे प्रगतीकडे वाटचाल

130 कोटी हिंदुस्थानी आपल्यातील कौशल्य, प्रतिभा आणि नव्या संकल्पनांच्या माध्यमातून देशाला प्रगतीकडे घेऊन जातील. त्यांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार पूर्ण सहकार्य करेल, असेही राष्ट्रपती यावेळी म्हणाले. सरकार गरीबातील गरीब लोकांना घरे, वीज, शौचालय आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक घरात नळ पोहचवण्याचा सरकार प्रयत्न करत असून रेल्वे प्रवासही सुरक्षित होईल. यादृष्टीने पावले उचलत असल्याचेही राष्ट्रतींनी यावेळी सांगितले.

जम्मू-कश्मीर आणि लडाखच्या जनतेलाही मिळणार सर्व अधिकार

जम्मू-कश्मीर आणि लडाखच्या जनतेलाही आता सर्व अधिकार मिळतील. त्यांनाही देशाच्या इतर जनतेप्रमाणे सर्व सोयीसुविधा मिळतील. समानतेला चालना देणार्‍या कायदा आणि कलमांचा त्यांनाही फायदा होईल. शिक्षणाचा अधिकारही त्यांना मिळेल. त्यांची मुले उच्च शिक्षण घेऊ शकतील. माहितीचा अधिकारही त्यांना मिळेल. नोकरीतील आरक्षण, सरकार आपल्यासाठी काय करते आहे ते जाणून घेण्यासाठीचा माहितीचा अधिकार त्यांना मिळेल. तीन तलाकसारख्या शापातून मुक्तता झाल्यामुळे आता आपल्या मुलींना न्याय मिळेल, असेही राष्ट्रपती म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या