मराठी चित्रपटाला जीएसटीमधून मुक्त करा!: चित्रपट महामंडळ

34

सामना प्रतिनिधी । पुणे

मराठी चित्रपटांचा प्रेक्षक कमी आहे. त्यात आता जीएसटी लागू झाल्यानंतर तिकीटावर २८ टक्के कर बसणार आहे. त्यामुळे तिकीटांच्या दरात वाढ होईल. त्याचा परिणाम प्रेक्षकांच्या संख्येवर होईल. त्यामुळे प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना जीएसटीमधून वगळावे अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केंद्रीय अर्थमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. मागणी १ जुलैच्या आत पूर्ण न झाल्यास चित्रपट निर्माते, कलावंत तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

आता मराठी चित्रपट करमुक्तच आहे, असे असतानादेखील मराठी चित्रपटांना म्हणावा इतका प्रेक्षक नाही. आता जीएसटी लागू झाल्यानंतर कर भरून चित्रपटाचे तिकीट घेणाऱ्यांची संख्या कमी होईल. मराठी चित्रपटांच्या प्रेक्षकांवर नक्कीच जीएसटीचा परिणाम होऊ शकतो. मराठी चित्रपटांना जीएसटीमधून मुक्त करावे. प्रादेशिक भाषेतील चित्रपटांनाही मुक्त करावे अशा मागणीचे निवेदन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना देण्यात आले आहे. येत्या १ जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास चित्रपट निर्माते, कलावंत तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मेघराज राजेभोसले यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या