वैद्यकशास्त्राच्या मदतीने…

50

डॉ. नितीन थोरवे

एकविसाव्या शतकात विज्ञानाच्या मदतीने माणसाने खूपच प्रगती केली आहे. त्यामुळे पर्यटनासाठी तो थेट चंद्रावर जाण्याची भाषा करू लागला आहे. विज्ञानामुळेच हा क्रांतिकारक बदल घडला आहे. हाच बदल प्राचीन काळातील चरक चिकित्सा पद्धतीच्या औषधोपचारातही झाला आहे. आज नॅनो मेडिसीनपर्यंत वैद्यकशास्र येऊन ठेपले आहे. म्हणजेच कल्पनाशक्तीच्या पलीकडे वाटणारे संशोधन आता वैद्यक शास्रात होतेय. केवळ डॉक्टरच नाही, तर सर्वसामान्य माणसानेही वैद्यकशास्राची योग्य माहिती करून घेतली तर तो स्वतःचे स्वास्थ्य नीट सांभाळू शकतो. पूर्वीच्या काळात कोणताही वैद्य किंवा ऍलोपॅथी डॉक्टर आलेल्या रुग्णाला त्याची संपूर्ण माहिती विचारून त्याच्या रोगाचे निदान करायचा. त्यानुसार मग त्या रुग्णाला औषधोपचार दिला जायचा. मात्र त्यानंतर जीवजंतूंचा अभ्यास होत गेला आणि रुग्णाला कमीतकमी त्रास होऊन लवकर व प्रभावीपणे उपचार होईल अशी औषधे शोधली जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या