६०० शिक्षणतज्ज्ञांचं मोदींना पत्र, कठुआ, उन्नाव प्रकरणांवर विचारले प्रश्न

272
modi-in-tension

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कठुआ आणि उन्नाव प्रकरणांमुळे अवघा देश हादरलेला असताना या घटनांचे पडसाद परदेशातही उमटताना दिसत आहेत. कारण, जगभरातल्या ६०० शिक्षणतज्ज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी देशातल्या गंभीर प्रश्नांवर मोदींच्या गप्प राहण्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, देशात १२ वर्षांखालील मुलांवर होणाऱ्या बलात्कारांसाठी फाशीच्या शिक्षेच्या अध्यादेशाला शनिवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. त्याच दिवशी हे पत्र आलं असून यात मोदींना सद्यस्थितीवरच्या त्यांच्या भूमिकेवरून प्रश्न विचारण्यात आला आहे. पत्रात असं लिहिलं आहे की, सध्या देशात परिस्थिती गंभीर आहे. त्यात भरीसभर म्हणून सत्तारुढांचा हिंसेशी असलेला परस्परसंबंध निर्विवादपणे उघड होताना दिसत आहे. पण, यावर तुम्ही बराच काळ मौन साधलं आहे. त्याचं कारण काय?, असा प्रश्न मोदींना उद्देशून विचारण्यात आला आहे.

या पत्रावर न्यूयार्क विश्वविद्यालय, ब्राऊन विश्वविद्यालय, हार्वर्ड, कोलंबिया येथील विद्यापीठं तसेच वेगवेगळ्या आयआयटी संस्थांच्या शिक्षण तज्ज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या