पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी करणार हॅट्रीक, वाचा सी व्होटरचा निवडणूकीआधीचा ओपिनियन पोल

mamata-benargee

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू व पुद्दुचेरी या राज्यांमध्ये एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. या सर्व राज्यांचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. या सर्व राज्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये काय होणार याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. त

शुक्रवारीच निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता एबीपी न्यूज व सी व्होटरने त्यांचे ओपिनियन पोल जाहीर केले आहेत. या पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचे सरकार येणार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रीक होऊ शकते. या ओपिनिय पोल नुसार तणमूल काँग्रेसला 148-164 जागांवर यश मिळू शकते तर भाजपच्या खात्यात 92-108 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस व माकपला 31-39 जागा मिळू शकतील.

आपली प्रतिक्रिया द्या