आगळं वेगळं – बुडबुडं तळं

>>मंगल गोगटे

समुद्र या एकाच आकर्षणासाठी गोव्यात जाणाऱयांची संख्या मोठी आहे, परंतु किती वेळ त्याकडे पाहण्यात घालवणार? शिवाय देवळं सोडल्यास नवीन काही नाही. मग अशा वेळी गोव्यातील बुडबुडय़ांचं तळ पाहणं हो त्यांच्यासाठी नवीन अनुभव असू शकतो. गोव्याचं ऊन खाऊन पंटाळल्यानंतर हे तळं पहाणं एक सावलीचा अनुभव आहे. गोव्यातच, पण कर्नाटकच्या सीमेजवळ नेत्रावली देऊळ आहे. त्याच्या जवळ जे पाण्याचं पुंड आहे, त्यात बुडबुडे पाहायला मिळतात. स्थानिक भाषेत या तळ्याला ‘बुडबुडं तळं’ म्हणतात.

असं म्हणतात की, टाळ्या वाजवल्या की हे बुडबुडे दिसतात आणि जितक्या जोरात टाळ्या वाजवू तितक्या जास्त संख्येने ते वरवर येतात. इथल्या काही श्रद्धाळू लोकांना वाटतं की, या पुंडाच्या तळाशी एक राक्षस झोपलेला आहे आणि आपण आवाज केला की, त्याची झोपमोड होऊ लागते. म्हणून तो जोराजोराने श्वास घेतो आणि मग जास्त बुडबुडे बाहेर येतात, तर काहींच्या मते इथे वसणाऱया देव-देवता हे जादुई बुडबुडे बनवतात.

हे बुडबुडे येण्याला काही वैज्ञानिक कारणे आहेत. शास्त्र्ाज्ञांच्या मते पुंडातील कार्बन डायऑक्साईड, चुन्याचे दगड, सल्फर डायऑक्साईड इत्यादींमुळे असे बुडबुडे तयार होऊ शकतात. या पुंडात खूप वनस्पती आहेत आणि भरपूर मासेदेखील. तरीही हे पाणी स्वच्छ दिसतं. इथले लोक हे पाणी पिण्यायोग्य समजतात, ते कदाचित चुन्याच्या उपस्थितीमुळे असेल.

असंच एक आश्चर्यजनक तळं आहे पॅनडामध्ये. अब्राहम तळ्यातलं हे आश्चर्य आहे सुंदर निसर्गाच्या कुशीत. पॅनडातील पर्वतांच्या पायथ्याशी हे दिसतं. हिवाळ्यात हे तळं पूर्णतः गोठलेलं असल्याने त्यावर चालता, फिरता, खेळता येतं. मिथेन गॅसमुळे येणारे या तळ्यातले बुडबुडेदेखील वर येता येता गोठतात आणि वर क्रिस्टलसारख्या बर्फामुळे खालचं सगळं स्पष्ट दिसतं. हा सगळा नजारा फारच सुंदर दिसतो.

प्रश्न असा आहे की, मिथेन गॅस तळ्यातून बाहेर का येतो आणि वर का येतो? तर तळ्याच्या पाण्यातील मृत सेंद्रिय पदार्थ तळ्याच्या तळाशी जातात आणि तिथल्या बॅक्टेरियामुळे तिथे कुजतात. हा बॅक्टेरिया मोठय़ा प्रमाणावर मिथेन सोडतात, जो बुडबुडय़ांच्या रूपात वर येऊ लागतो. जेव्हा ते वर येतात तेव्हा अति थंड हवेशी संपका&त आल्याने ते गोठतात. असे अनेक गोठलेले बुडबुडे तळ्यात दिसतात. हे बुडबुडे अगदी विशेष असतात आणि प्रत्येक बुडबुडा वेगळ्या आकाराचा व वेगळ्या घनतेचा दिसतो. सगळे बुडबुडे पाण्याखाली चमकतात आणि लोकांना आकर्षित करतात. हे चमचमणारं नैसर्गिक आश्चर्य पॅमेऱयात चित्रबद्ध करण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक…सगळेच धडपडत असतात.

गोव्यातील तळ्याप्रमाणे या तळ्याचं पाणीदेखील अगदी स्वच्छ आहे आणि त्यामुळे वरच्या थरावरूनसुद्धा अगदी तळापर्यंतचे मिथेन गॅसचे गोठलेले बुडबुडे दिसतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते अगदी एखाद्या टॉवरसारखे दिसतात. हिवाळ्यात हजारो लोक पॅनडामधे खास फिरण्यासाठी येतात आणि या मोहक सौंदर्याने आश्चर्यचकीत आणि घायाळ होतात.

हे तळं पूर्णपणे गोठलेलं असल्याने लोक त्यावर आरामशीरपणे बसू शकतात, चालू शकतात आणि स्केटिंगही करू शकतात, परंतु अशी भीती व्यक्त केली जात आहे की, मिथेन गॅसची पातळी वाढली तर जगाच्या तापमानावर त्याचा काही परिणाम होईल का? सध्या यावर खूप मोठय़ा प्रमाणात संशोधन चालू आहे.

या लेकमधील पाण्यातील सुंदर मिथेन बुडबुडे जे पर्वतराजींनी वेढलेले आहेत, ते एक विलोभनीय दृश्य आहे आणि शिवाय ही जागा साहसी कृत्य करण्यासारखीदेखील आहे. इथे काढलेल्या डोळ्यांना आणि मनाला भुरळ घालणाऱया पह्टोंमुळे तर हा प्रवास जास्त सुखकर भासू लागतो. हे पह्टो आपण इतरांना पाठवू शकतो आणि आपणही परत परत पाहून प्रवासाचा आनंद आणि पुनर्प्रत्यय घेऊ शकतो. रात्रीसुद्धा हा बुडबुडे पाहण्याचा आनंद घेता येतो, ज्याची मजा वेगळी आहे.

एकदा बर्फ एक इंच जमला की, जास्त बुडबुडे जमायला सुरुवात होते. अब्राहम तळं सुमारे शंभर चौरस फूट आहे. त्यातल्या सगळ्याच भागात हे बुडबुडे जमतीलच असं नाही. म्हणून बुडबुडे पाहायचे असतील तर धरणाच्या आसपास आणि अति वाऱयाच्या जागा तसंच खाडी आणि नदी, तळ्यात मिळते या जागा टाळायला हव्यात. या ‘बुडबुडं तळ्या’तलं आश्चर्य पाहण्यासाठी तळ्यावरील बर्फ सुमारे दहा इंच तरी जमला असेल, अशाच जागा शोधायला हव्यात.
[email protected]