१५.६३ कोटींचं वासुदेव गायतोंडेचं चित्र

13

सामना ऑनलाईन। मुंबई

जगविख्यात अमूर्त चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचं चित्र एका लिलावामध्ये तब्बल १५.६३ कोटी रूपयांना विकलं गेलं. खिस्टी या लिलाव करणाऱ्या कंपनीने मुंबईमध्ये या लिलावाचं आयोजन केलं होतं. या लिलावाला नोटाबंदीमुळे अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र कलाप्रेमींसाठी गायतोंडेंची चित्रे ही नेहेमीच प्रतिष्ठेचा आणि मानाचा विषय राहीली असल्याने त्यांच्या चित्राला इतकी मोठी किंमत मिळणं शक्य झालं.
वासुदेव गायतोंडे यांचं या लिलावात विकलं गेलेलं अमूर्त चित्र हे १९७४ साली रेखाटलेलं असून त्यावर त्यांची सही देखील आहे. गायतोंडे यांनीच काढलेल्या दुसऱ्या एका चित्राला ११.४३ कोटी रूपये मोजून खरेदी करण्यात आलं आहे. हे चित्र १९७३ साली रेखाटण्यात आलं होतं. या लिलावामध्ये विविध कलाकारांच्या ७२ कोटी २६ लाख रूपयांच्या कलाकृती विकल्या गेल्या.
गायतोंडेच्या चित्रकृतींव्यतिरिक्त तय्यब मेहता, भुपेन खक्कर,अकबर पदमसी,जेहांगीर साबावाला यासारख्या चित्रकारांची प्रसिद्ध चित्रेही लिलावात विकण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या