कडक उन्ह्याळ्यात घर थंडगार कसं ठेवायचं? वाचा या महत्वाच्या टीप्स

एकीकडे सुर्य आग ओकतोय. वाढत्या उन्हाळ्यामुळे घरातही उकडायला लागलं असून, घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नसल्याने उकाड्याचा मुकाबला करण्यासाठी एसी,पंखे, कूलर यांचा वापर वाढला आहे.

ऑफिसमधल्या थंडगार वातावरणाची सवय असलेली मंडळी वर्क फ्रॉम होम करत असताना उकाड्याने चिडचिडी झाली आहेत. या परिस्थितीत घर थंड ठेवण्यासाठी एअर कंडीशनर पूर्ण क्षमतेने आणि व्यवस्थित काम करणारा असला तर तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळू शकतो. एसी दुरुस्त करणाऱ्यांना आणि देखभालीसाठी सेवा करारात बांधल्या गेलेल्या कंपन्यांना सध्या ग्राहकांच्या घरी जाऊन एसीची पाहणी, देखभाल, दुरुस्ती करता येत नाहीये.

गोदरेजच्या घरगुती उपकरणांसाठीच्या सेवा विभागाचे राष्ट्रीय प्रमुख असलेल्या रवी भट यांनी अशा परिस्थितीत घर थंड ठेवण्यासाठी आणि एसीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही सोप्या टीप्स दिल्या आहेत. यामुळे तुम्ही तुमचे घर एकदम कूल..कूल ठेवू शकाल.

घरात येणाऱ्या सुर्यकिरणां सकाळी 10 नजर पडद्याच्या मदतीने अडवण्यास करण्यास सुरुवात करा. जाड पडद्यांच्या मदतीने घरात पूर्णपणे अंधार केल्यास घरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

curtains

खिडक्या किंवा दरवाजे उघडे ठेवून एयर कंडिशनर सुरू ठेवू नका. खोलीचे दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे बंद केल्यानंतरच ए.सी सुरु करावा.

air-condition-1

योग्य थंडावा आणि उर्जा बचतीसाठी एयर कंडिशनरचे आदर्श तापमान हे 24- 26 डिग्री सेल्सियस इतके असते.

heat-tempreture

ए.सीचे तापमान सेटींग 22 डिग्री सेल्सियसनंतर जितके अधिक ठेवले जाते तितकी प्रत्येक डिग्रीमागे 3 ते 5 टक्के कमी उर्जा लागते.

heat

रात्रीच्या वेळेस ए.सी साठी स्लीप फंक्शन वापरावे

sleep

दिवसा ड्रायर, डिशवॉशर आणि ओव्हनसारख्या उष्णता तयार करणाऱ्या उपकरणांचा कमी वापर करा. या उपकरणांचा वापर तुम्ही अंधार झाल्यानंतर किंवा तापमान कमी असताना वापर करू शकता.

microwave

ए.सी.चे एयर फिल्टर स्वच्छ ठेवा म्हणजे थंडावा पूर्ण क्षमतेसह आणि सर्वात जास्त होतो

cleaning

एयर कंडिशनर सुरू असताना खोलीत धूळ झटकू नका

cough

थंडावा सगळीकडे सारखा पसरावा यासाठी अधूनमधून पंखा सुरू करा आणि एयर ब्लो खालच्या बाजूने वळवा, यामुळे एसीच्या बाहेर बसवलेल्या युनिटला कमी जोर लावावा लागेल आणि सहजपणे थंडावा निर्माण करता येईल.

fan

बाहेरच्या युनिटभोवती स्वच्छता राखा आणि त्यामध्ये धूळ अडकणार नाही याची काळजी घ्या. धुळीमुळे यंत्रणेला काम करण्यासाठी जास्त क्षमता लावावी लागते आणि पर्यायाने त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

enjoy-life-now-this-is-not

या उपाययोजनांच्या मदतीने काळजी घ्या उन्हाळ्याचाही आनंद घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या