वनविभाग लेखापालाला दोन हजाराची लाच घेतांना रंगेहात अटक

18

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

वनविभागातील उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयातील लेखापालाला दोन हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदर लेखापालाने आपल्या शेतीमधील सागवानाची झाडे शेतातून घरी नेण्यासाठी पासींग हातोडा व वाहतूक परवाना मिळवून देण्याकरिता लेखापालाने दोन हजाराची मागणी केली होती.

गडचिरोली लाचलुचपत विभागाच्या कारवाईत सदर लेखापाल सापडला आहे. शशीकांत ओमप्रकाश घोनमोडे वय ४७ या लेखापालाने तक्रारदाराकडून शेतातून सागवानी झाडे तोडून घरी नेण्यासाठी वाहतूक परवाना, पासींग हातोडा मिळविण्यासाठी दोन हजाराची मागणी केली होती. तक्रारदाराला सदर रक्कम देण्यास विरोध असल्यामुळे त्यांने गडचिरोली लाच लुचपत विभागात तक्रार दाखल केली व सापळा रचून त्याला पकडण्यात आले.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक रवी राजुलवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलीस हवालदार प्रमोद ढोरे, महेश कुकुडकार, सुधाकर दंडीकेवार, सतीश कत्तीवार, देवेंद्र लोनबले, नथ्थु धोटे, गणेश वासेकर, सुभाष सालोटकर, किशोर ठाकूर, महिला पोलिस शिपाई सोनी तावाडे, चालक शिपाई तुळशीराम नवघरे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या