एक लाखाची लाच स्विकारणाऱ्या सहाय्यक अभियंत्यासह तिघांना अटक

26

सामना प्रतिनिधी । धाराशिव

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता सुधीर त्र्यंबक बुरनापल्ले, वरिष्ठ तंत्रज्ञ सरदारखान युसूफखान पठाण व खाजगी गुत्तेदार पांडुरंग सिध्दराम जाधव यांनी संगनमताने तक्रारदाराकडे दिड लाख रूपयांच्या लाचेची मागणी करुन त्यापैकी एक लाख रुपये स्विकारल्याने तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या वतीने ताब्यात घेण्यात आले आहे.

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या शेतामधील बोअरवेलसाठी सहा महिन्यापासून बंद असलेली विद्युत डिपी सुरु करण्यासाठी तसेच आणखी एका नवीन डिपीचा रिपोर्ट वरिष्ठाकडे पाठवून ते इस्टीमेट मंजूर करण्यासाठी नळदुर्ग महावितरण येथील सहाय्यक अभियंता सुधीर त्र्यंबक बुरनापल्ले, वरिष्ठ तंत्रज्ञ सरदारखान युसूफखान पठाण व खाजगी गुत्तेदार पांडूरंग सिध्दराम जाधव यांनी शेतकऱ्यांकडे दिड लाख रुपये लाचेची मागणी केली. याबद्दलती तक्रार शेतकऱ्याने धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून आज शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी मुरुम मोड येथे दिड लाख रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपयाची लाच सहाय्यक अभियंता सुधीर त्र्यंबक बुरनापल्ले व वरिष्ठ तंत्रज्ञ सरदारखान युसूफखान पठाण यांच्या सांगण्यावरुन स्विकारतांना खाजगी गुत्तेदार पांडुरंग सिध्दराम जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या वतीने रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक बी. व्ही. गावडे हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या