आदिवासी महिलेला कारची धडक

36

कसारा – मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा (खु) लतिफवाडीजवळ रस्ता ओलांडताना एका महिलेला तवेरा कारने उडविल्याने स्थानिक ग्रामस्थांनी दोन तास रास्ता रोको करीत राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. संध्याकाळी ७.३०ची ही घटना असून लतिफवाडी येथील हॉटेलमधून काम करून घरी जाण्यासाठी निघालेल्या मधू नामक महिलेला रस्ता ओलांडत असताना नाशिककडे भरधाव जाणाऱया तवेरा गाडीने धडक देऊन पळ काढला. जखमी महिला उपचारासाठी तब्बल एक तासभर रस्त्यावर तडफडत होती. ग्रामस्थांनी महामार्ग पोलीस, रुग्णवाहिकेला संपर्क साधूनही कोणीच वेळेवर आले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. कसारा पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी ग्रामस्थांना आश्वासन देत आंदोलन मागे घेण्यास सांगितले. ग्रामस्थांनी दोन दिवसाची पोलीस प्रशासनास मुदत देत आंदोलन मागे घेतले. स्थानिक ग्रामस्थ सलीम शेख, दत्ता वातडे, संदीप भोसले आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या