मार्केटयार्ड परिसरात डंपर चालकाने महिलेला चिरडल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी चांदणी चौकात मालवाहतूक करणाऱया एसटी चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. कार्गो वाहन चालकाने मिक्सर वाहनचालकाला धडक दिल्यामुळे चारजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यापैकी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
अपघातात प्रफुल्ल नागपुरे, प्रसाद साळुंखे आणि कविता साठे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सलग दुसऱया दिवशी झालेल्या अपघाताने पुणेकर चिंतेत आहेत.
एसटी महामंडळाची कार्गो बस गुरुवारी सायंकाळी हिंजवडीहून कोथरूडच्या दिशेने येत होती. त्या वेळेस चांदणी चौकातून खाली उतरत असताना बस चालकाचे अचानकपणे नियंत्रण सुटल्याने बस मिक्सर वाहनाला धडकली. त्यामुळे दोन्ही वाहने दुभाजक तोडून दुसऱया लेनवर गेली. एसटीने मिक्सर वाहनाला धडक दिली. त्यानंतर समोरून जाणाऱया दोन दुचाकाRना एसटीने जोरदार धडक दिली. अपघातात एक दुचाकी एसटीच्या चाकाखाली आली, तर दुसरी दुचाकी दुभाजकाला जाऊन आदळली. परिणामतः या अपघातात तिघेजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यातील एका तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
अपघातग्रस्त महिला भूगाव येथून कोथरूडकडे निघाली होती, तर दुसऱया दुचाकीवरील तरुण मूळचा गोंदियामधील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तोही दुचाकीवर कोथरूडच्या दिशेने जात होता. मात्र त्याच वेळी भरधाव कार्गो बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उतारावरून गाडी दुसऱयाच लेनवर गेल्याने भीषण अपघात झाला. अपघातामुळे बराच वेळ वाहतूककाsंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कोथरूड वाहतूक पोलीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील वाहतूक सुरळीत केली.
अपघात घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य दिले. दरम्यान, एसटी कार्गो चालकाने मिक्सर वाहन चालकाला धडक दिल्यामुळे अपघात झाल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले आहे.
z संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ–3