लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, आठ जण जागीच ठार

67

सामना प्रतिनिधी । नागपूर

लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात होऊन आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील नेलसनार येथे हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या पिकअपला दुसऱ्या पिकअपने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की आठ जणांचा जागीच मृत्यू झाला,तर 24 जण गंभीर जखमी झाले आहेत, गंभीर जखमींना उपचारासाठी बिजापूर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या