चालत्या रेल्वेमधून उतरताना अपघात, महिलेचा पाय कापला

48

सामना प्रतिनिधी । गोंदिया

चालत्या गाडीतून उतरू नका अशा सुचना रेल्वेकडून वारंवार देण्यात येत असल्या तरी अनेक जण चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करतात आणि अपघात होतो. असाच एक प्रकार गोंदियामध्ये घडला आहे. गोंदियाकडून येणाऱ्या गोंदिया बल्लारशहा पॅसेंजर या चालत्या रेल्वे गाडीतून उतरताना तोल गेल्याने रेल्वेखाली आल्यामुळे एका वृद्ध महिलेचा डावा पाय कापला गेला आहे.

वच्छला विश्वनाथ बडोले (७३) असे पाय तूटलेल्या महिलेचे नाव आहे. त्या भंडारा जिल्ह्यातील बारवा येथील रहिवासी आहेत. जखमी महिलेवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जखमी महिलेला रेल्वे विभागाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पूरेपूर मदत करण्यात येईल, असे व्यवस्थापक पी.एस. भोंडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या