कश्मीरात सुरक्षा दलाचे वाहन कारला धडकून भीषण अपघात, दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

432

जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिह्यात सुरक्षा दलाच्या वाहनाने कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमध्ये बसलेल्या 10 वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर आणखी तिघे प्रवासी गंभीर जखमी झाले. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यात कारचा पार चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. प्रचंड घोषणाबाजी केली. गर्दी वाढतच गेल्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. यात तीघे जखमी झाले. तहसीन अहमद भट असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

सुरक्षा दलाचे वाहन कारवर जोरात आदळल्यामुळे कारमधील दहावीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर आणखी तिघे जखमी झाले. कारचा पार चेंदामेंदा झाल्यामुळे कारला क्रेनने उचलून बाजूला करावे लागले. दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यामुळे स्थानिक रहिवाशी प्रचंड संतापले. संतापाच्या भरात त्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले. या आदोलनात मोठया संख्येने आंदोलकांनी सहभाग घेतल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. यात तीन आंदोलनकर्ते जखमी झाले.

आपली प्रतिक्रिया द्या