कोळंब पुलावर अपघात

10

मालवणः धोकादायक कोळंब पुलावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी कोळंबच्या दिशेने उभारण्यात आलेली लोखंडी कमान अज्ञात वाहनाच्या धडकेत शुक्रावरी (२०) सायंकाळी कोसळली होती. तर शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाने मालवणच्या दिशेने असणाऱ्या दुसऱ्या लोखंडी कमानीला धडक देऊन नुकसान केले.

शुक्रवारी सायंकाळी कमानीला धडक देत पळुन गेलेल्या बोलेरो गाडी एमएच ०९ सीए ७८०९ व रात्री दुसऱ्या कमानीला धडक देणाऱ्या अज्ञात वाहन चालकाविरोधात बांधकाम विभागाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर पुलाच्या दोन्ही बाजुला स्पीडब्रेकर उभारण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली. तर कमान दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले. धोकादायक पुलावरुन अवजड वाहनांची वाहतूक झाल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरणार असल्याचा अहवालही प्रांताधिकारी कार्यालयाकडून बांधकाम विभागाकडे देण्यात आला होता. त्यामुळे पुलावरुन मालवाहक वाहनाच्या वाहतुकीवर बांधकाम विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसात तक्रार देण्याची असल्याची माहिती बांधकाम विभागाचे उप अभियंता पी. डी. पाटील यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या