नाशिकमध्ये ट्रकला अपघात, २ ठार

52

नाशिक: नाशिकमध्ये शनिवारी मध्यरात्री ट्रकला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. द्वारका येथील उड्डाण पुलावर ही घटना घडली.

द्वारका उड्डाण पुलावर टायर पंक्चर झाल्याने एक ट्रक रोडच्या कडेला उभा होता. त्या नादुरुस्त ट्रकला मागच्या बाजूने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ट्रकचा चुरा झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकाचे नाव महेश गंगा सिंग आहे. ओझर येथून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला हा अपघात झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या