कार आणि दुचाकीत भीषण अपघात, एकाचा मृत्यू

12

सामना प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड

दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका १६ वर्षीय मुलाच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ओम देशमुख(16) असं मृत मुलाचं नाव आहे. नवी सांगवी येथील फेमस चौकात हा अपघात झाला. या घटनेनंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

ओम सुट्टीत मामाकडे राहण्यासाठी आला होता. कामनिमित्त दुचाकीवरून जात असतांना एका कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ओमच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. घटनास्थळावरून फरार झालेल्या कार चालकाचा पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या