अरणगावजवळ बाह्यवळण रस्त्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

अरणगावजवळील बाह्यवळण रस्त्यावर शनिवारी सकाळी ट्रक व कंटेनरचा अपघात झाला. या अपघात झालेल्या वाहनांना मागून येणारी स्विफ्ट कार जोरात धडकली. या विचित्र अपघातात दोन जण मृत्युमुखी पडले असून एक जण गंभीर जखमी आहे. या अपघातात सुब्रमण्यम गोबल (वय 48, रा. पदीरकुडइ, तामिळनाडू), प्रधान सुरेश कांत जाट (वय 36, रा.अजमेर, राजस्थान) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

बाह्यवळण रस्त्यावर अरणगाव परिसरात शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ट्रक-कटेंनर आणि स्विफ्ट कार या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच अरणगाव ग्रामस्थांसह नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मार्गावर शनिवारी सकाळी बाह्यवळण रस्त्यावर ट्रक व कंटेनरचा अपघात झाला. या अपघातग्रस्त वाहनांना मागून येणारी स्विफ्ट कार जोरात धडकली. त्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी असलेल्या एकाला रुग्णालयात नेण्यात आले आहे. या बाह्य रस्त्यावर अपघातामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.

याच ठिकाणी आठ दिवसांपूर्वी दोन वाहनांचा अपघात झाला होता. त्यात दोन जण जखमी झाले होते. त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन केले होते. साईड पट्या, सर्व्हिस रोड, दिशादर्शक फलक लावण्याच्या आश्‍वासनानंतर कार्ले यांनी आंदोलन मागे घेतले होते. आता पुन्हा त्याच ठिकाणी अपघात झाला आहे.