पंढरपूर जवळ भाविकांच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

122

सामना प्रतिनिधी । आष्टी

एकादशी निमित्त पंढपूर येथे दर्शनासाठी निघालेल्या आष्टी तालुक्यातील खकाळवाडी येथील भाविकांच्या स्कॉर्पिओ गाडीस अपघात झाला यात एका भाविकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. लालाभाऊ धोंडिबा शिंदे (60) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

तालुक्यातील खकाळवाडी येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुर येथे हे भाविक निघाले होते. पंढरपूर जवळील विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे भाविकांची स्कॉर्पिओ क्र.MH -23 Y-551 आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी चिंचेच्या झाडावर आदळली. यामध्ये लालाभाऊ धोंडिबा शिंदे (60) हे जागीच ठार झाले, तर गाडीतील राम सोनवणे (55) शेरी बु. भाऊसाहेब सोनवणे (50) शेरी बु, अंकुश थेटे (38) चोभा निमगाव, सुभाष नरवडे (55) वटणवाडी, किसन गायकवाड (62) वटणवाडी, आणि मोरे (65) कडा, हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गॅलेक्सी हॉस्पिटल, पंढरपूर येथे उपचार सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या