समाजसेविका सीमा साखरे यांच्या मुलीचा अपघाती मृत्यू

44

सामना प्रतिनिधी । नागपूर

समाजसेविका सीमा साखरे यांच्या मुलीचा नागपूर-सावनेर राष्ट्रीय महामार्गावर अपघाती मृत्यू झाला. सुहासिनी त्र्यंबक साखरे (४४) यांची नॅनो पिवळा पूल येथे ट्रकला धडकली, असे पोलिसांनी सांगितले.

सुहासिनी साखरे वकील होत्या. त्या दुपारी सावनेरहून नागपूरला येत होत्या. प्रवासादरम्यान नॅनोला अपघात झाला. अपघातात सुहासिनी साखरे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचा क्लीनर इसराइल हनीफ शेख (३१, रा. वर्धमाननगर) पसार झाला आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. खापरखेडा ठाणेदार अशोक साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास होत आहे.

suhasini-sakhare

आपली प्रतिक्रिया द्या