लग्नासाठी बँड घेऊन निघालेल्या टेम्पोला अपघात, १७ जखमी

सामना ऑनलाईन । चेन्नई

लग्नासाठी खास मुंबईहून निघालेल्या बँड पथकाच्या टेम्पोला मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात झाला. या अपघातात १७ जण जखमी झाले असून ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते.

डहाणूमध्ये अनेक बँड पथकं नावाजलेली आहेत. त्यामुळे लग्नासाठी ठिकठिकाणाहून त्यांना खास निमंत्रण मिळते. अशीच एक ऑर्डर मिळाल्यानंतर बँड पथक डहाणूहून निघालं होतं. मात्र त्यांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला. या अपघातात १७ जण जखमी झाले. तर ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या