मुंबई गोवा महामार्गावर अपघातात १ ठार, ४ गंभीर

47

सामना प्रतिनिधी । पेण

मुंबई गोवा महामार्गावर हमरापूर फाटा येथे गॅस ट्रक व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नागोठणे येथील चार तरुण गंभीर जखमी झाले असून एक जण जागीच ठार झाला आहे.

सोमवारी पहाटे ४:१५ वाजता दोन्ही वाहने अंबिवली गावाच्या हद्दीत आली असता मारुती ब्रिझाकार वरील पवन चौधरी या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार अलिबागकडून मुंबईकडे जाणाऱ्या गॅस ट्रकवर आदळली. यामध्ये वरद खराडे (१८) पवन चौधरी (१८) रईस कुरेशी (१९) हिमांशू श्रीरामे (१८) हे तरूण गंभीर जखमी झाले असून अनुज भुरके (१९) हा युवक जागीच ठार झाला आहे. हे युवक मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे फिरावयास गेले होते. तिथून परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला.

अपघात झाल्याचे समजतात स्थानिक ग्रामस्थांनी तसेच पोलिसांनी जखमींना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या