मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे वर डांबराचा टँकर पलटी; चालक जखमी, वाहतूक मंदावली

469

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर देहूरोड किवळे पुलावर मुंबईवरून सांगलीला डांबर घेऊन जाणारा एक टँकर पलटी झाला. डांबर रस्त्यावर सांडल्याने पुण्याला जाणारी एक लेन काही काळ बंद ठेवण्यात आली आहे.

मुंबईवरून सांगलीला निघालेल्या टँकरमध्ये 29 टन डांबर होते. टँकर अवघड वळणावर पलटी झाला. या अपघातात चालक राहुल यादव हा जखमी झाला आहे. त्याला पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी आयआरबीचे कर्मचारी पोहोचले असून देहूरोड-रावेत रस्त्यावर सांडलेला डांबर साफ करण्यात आला. तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून काही वेळाकरता पुण्याला जाणारी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या