राजस्थान- ट्रक आणि गाडीची भीषण टक्कर, सात जणांचा मृत्यू

549
accident

राजस्थान येथील चुरू येथे झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी चुरू येथील राष्ट्रीय महामार्ग 58वर हा अपघात झाला.

सोमवारी सकाळी फॉर्च्युनर गाडी आणि एका ट्रकची भीषण टक्कर झाली. या टकरीमुळे गाडीतील 8 प्रवाशांपैकी सात जणांचा मृत्यू झाला. गाडीतील प्रवासी रोलसाहबसर ते सुजानगढ असा प्रवास करत होते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या अपघाताविषयी हळहळ व्यक्त केली आहे. या अपघाताविषयी ऐकून आपल्याला दुःख झालं असून पीडितांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना हे संकट सहन करण्याची शक्ती मिळो, असं म्हणत जखमींच्या प्रकृतीविषयीही कामना केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या