बारावीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

24

सामना प्रतिनिधी। जालना

बारावीच्या परीक्षेसाठी भोकरदनहून जालन्याकडे निघालेल्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. सुनील घुनावत आणि अनिल घुनावत अशी मृतांची नावे आहेत. तर करण सुंदरडे असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. हे तिघे एकाच दुचाकीवरुन परिक्षा केंद्राकडे जात होते.

अपघातात सुनीलच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान अनिलचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातात गंभीर जखमी झालेल्या करण सुंदरडेवर उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.

सुनील घुनावत आणि अनिल घुनावत हे मावसभाऊ होते. तर अनिल व करण हे दोघे रामेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. सुनीलच्या दुचाकीवरुन ते परिक्षाकेंद्राकडे निघाले होते. त्याचवेळी जालना रोडवर असलेल्या कृषी कार्यालयासमोर भरधाव वेगात जालन्याकडे जाणाऱ्या ट्रक GJ18 AX 1977 ची धडक दुचाकीला बसली. हा अपघात इतका भीषण होता की सुनीलच्या डोक्यावरुनच ट्रक गेला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या अनिलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या