उभे राहून पाणी पिताय? ‘या’ समस्या उद्भवू शकतात

मनुष्य एक महिना अन्नावाचून जिवंत राहू शकतो, परंतु पाण्याभावी एका आठवढ्यात त्याचा मृत्यू होऊ शकतो.

सामना ऑनलाईन । मुंबई

शरीराचे कार्य उत्तम चालण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते. अनेक जण घरा बाहेरुन आल्यावर घाई-घाईत उभे राहूनच पाणी पितात. मात्र असं उभे राहून पाणी पिणे शरीरासाठी घातक ठरु शकते. या सवयीमुळे शारीरिक आजारांना सामोरे जावे लागू शकते.

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास अनेक प्रकारच्या शारीरिक हालचाली करणे देखील कठीण होते. पाणी पिण्याची विशिष्ठ पद्धत आहे. आपल्यापैकी बरेच लोकांना उभे राहूनच पाणी पिण्याची सवय असते. पाणी पिण्याची ही पद्धत आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. आयुर्वेदात उभे राहून पाणी पिण्याची ही पध्दत अतिशय चुकीची असल्याचे सांगितली आहे. उभे राहून पाणी पिण्याने किडनी आणि संधिवात यासंबंधी आजारांच्या समस्या उद्भवू शकतात.

पाचकसंबंधी रोग : जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा पाणी वेगाने अन्ननलिकेतून खाली येत असते. त्यामुळे पोट आणि पोटाच्या आजूबाजूच्या भागांना दुखापत होते. उभे राहून वारंवार पाणी पित असल्यास पचन कार्याच्या प्रक्रियेत बिघाड होऊ शकतो.

संधिवात : उभे राहून पाणी पिण्याने शरीरातील सांध्यांमध्ये असलेल्या द्रवपदार्थावरचा ताण वाढतो आणि यामुळे संधिवाताची समस्या निर्माण होऊ शकते.

किडनी समस्या : जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा पाणी किडनी मधून फिल्टर न होता सरळ खाली जाते. यामुळे किडनी आणि मूत्राशयात घाण जमा होते, त्यामुळे मूत्रमार्गाचे किंवा किडनीच्या रोगाचे संक्रमण होण्याची शक्यता वाढते.

आपली प्रतिक्रिया द्या